रत्नागिरी: कर्नाटक राज्यातील चिकोडी येथे दुचाकी अपघातात रत्नागिरी येथील रवी शिवाजी राठोड (४७, रा. मुरुगवाडा, रत्नागिरी) या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. १७ जुलै रोजी ही घटना घडली होती.
मिळालेल्या माहितीनुसार, रवी राठोड हे कर्नाटक येथील मुचकंडी येथे आपल्या दुचाकीवरून (एमएच ०८ एडब्ल्यू ३६१३) जात असताना अचानक त्यांची दुचाकी घसरली आणि अपघात झाला. या अपघातात रवी यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. त्यांना तात्काळ बेळगाव येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.
उपचारानंतर त्यांना रत्नागिरी येथे आणले जात असताना, २९ जुलै रोजी वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. या घटनेची नोंद पोलिसांत करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे. रवी राठोड यांच्या निधनामुळे रत्नागिरी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.