रत्नागिरी: दमा या आजाराने त्रस्त असलेल्या एका ८५ वर्षीय वृद्ध महिलेचे निधन झाले आहे. त्यांच्यावर रत्नागिरी येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू होते.
महानंदा शंकर शिवलकर (वय ८५, रा. आरे, पो. बसणी, शिवलकरवाडी, ता. रत्नागिरी) या गेल्या काही दिवसांपासून दम्याच्या विकाराने त्रस्त होत्या. त्यांना उपचारासाठी रत्नागिरीच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असतानाच १५ ऑगस्ट २०२५ रोजी रात्री ९:०० वाजता त्यांचे निधन झाले.
मयत महानंदा शिवलकर यांचा मुलगा यांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. १६ ऑगस्ट रोजी सकाळी ७:५४ वाजता पोलिसांनी या घटनेची आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद केली आहे.