तुषार पाचलकर / राजापूर
उत्सव, संस्कृती आणि पर्यटनाचा संगम साधणारा पारंपरिक दहीहंडी महोत्सव यंदा पाचल येथे मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. आमदार मा. श्री. किरण (भैया) सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अपूर्वाताई किरण सामंत यांच्या सहकार्याने शिवशक्ती महिला गोविंदा पथकाला आमंत्रित करण्यात आले आहे.
हा दहीहंडी सोहळा १६ ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी १२ वाजता वैभव हॉटेलसमोर होणार असून, विजेत्या पथकाला तब्बल ₹२५,५५५/- इतकी बक्षिसी जाहीर करण्यात आली आहे.
आयोजक मंडळाने सर्वांना आवाहन केले आहे की, “हा सोहळा फक्त क्रीडा स्पर्धा नसून, एकतेचा आणि परंपरेचा उत्सव आहे. सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी.”
पाचल येथे दहीहंडी सोहळा, २५,५५५ रुपयांचे बक्षीस
