खेड : तालुक्यातील चाकाळे-जगदीशनगर येथील 65 वर्षीय वृद्धाचा सर्पदंशाने मृत्यू झाल्याची घटना 14 सप्टेंबर रोजी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. बाळकृष्ण शंकर जाधव असे मृत व्यक्तीचे नाव आहे. ते घरी झोपलेले असताना त्यांना सापाने दंश केला. उपचारासाठी तातडीने कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले, मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. या घटनेची आकस्मिक मृत्यूची नोंद स्थानिक पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
खेडमध्ये वृद्धाचा सर्पदंशाने मृत्यू
