GRAMIN SEARCH BANNER

ब्रेकिंग: रत्नागिरी जिल्ह्यात २७ ऑगस्ट, २ व ६ सप्टेंबरला मद्यविक्री बंद

Gramin Varta
7 Views

रत्नागिरी : बुधवार दि. 27 ऑगस्ट रोजी श्री गणेश चतुर्थी, मंगळवार दि. 2 सप्टेंबर रोजी ज्येष्ठा गौरी विसर्जन, शनिवार दि. 6 सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशी या तीनही दिवशी जिल्ह्यातील सर्व किरकोळ देशी/विदेशी मद्य विक्री व ताडी/माडी विक्री अनुज्ञप्ती संपूर्ण दिवस बंद राहतील, असे आदेश जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी दिले आहेत.

या वर्षी 27 ऑगस्ट ते  6 सप्टेंबर 2025 या कालावधीत गणेशोत्सव साजरा होणार आहे. गणेशोत्सवाच्या कालावधीत जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था राखण्याच्यादृष्टीने मुंबई मद्य निषेध अधिनियम 1949 चे कलम 142 अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करुन जिल्हाधिकारी श्री. सिंह यांनी  बुधवार दि.27 ऑगस्ट रोजी श्री गणेश चतुर्थी, मंगळवार दि.2 सप्टेंबर रोजी ज्येष्ठा गौरी विसर्जन, शनिवार दि.6 सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशी या तीनही दिवशी जिल्ह्यातील सर्व किरकोळ देशी/विदेशी मद्य विक्री व ताडी/माडी विक्री अनुज्ञप्ती संपुर्ण दिवस बंद राहतील, असे आदेश जिल्हाधिकारी श्री. सिंह यांनी दिले आहेत.

या आदेशाची अंमलबजावणी काटेकोरपणे करावयाची असून, यामधे कसूर केल्यास संबंधित अनुज्ञप्तीधारकांविरुध्द मुंबई मद्य निषेध अधिनियम 1949 मधील तरतुदींनुसार कारवाई करण्यात येईल, याची नोंद घ्यावी.

Total Visitor Counter

2649907
Share This Article