GRAMIN SEARCH BANNER

रत्नागिरी : क्रांतीनगर येथे कचरा डेपोमध्ये सापडलेले नवजात अर्भक सुखरूप; डॉक्टरांच्या निगराणीखाली सुखरूप; निर्दयी मातेचा शोध सुरू

Gramin Varta
662 Views

श्वान पथक, सीसीटीव्ही कॅमेऱ्याद्वारे कसून तपास

रत्नागिरी: शहरातील क्रांतीनगर येथील कचरा डेपोमध्ये केवळ दोन दिवसांचे नवजात पुरुष अर्भक जिवंत अवस्थेत आढळून आल्याची घटना शनिवारी उघडकीस आली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली होती. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक नागरिकांच्या मदतीने अर्भकाला सुरक्षित ताब्यात घेऊन त्वरित जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. शहर पोलिस बाळाच्या आईच्या शोधासाठी शहरातील सीसीटीव्ही फूटेज तपासत आहेत. तसेच श्वान पथकही बोलावण्यात आले होते. मात्र मातेचा शोध लागलेला नाही.

सध्या हे बाळ रुग्णालयातील अतिदक्षता विभागात डॉक्टरांच्या निगराणीखाली ठेवण्यात आले असून त्याची प्रकृती स्थिर आहे. वैद्यकीय पथकाकडून आवश्यक उपचार सुरू असून बाळ सुखरूप असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली आहे.

दरम्यान, इतक्या निर्दयपणे नवजात अर्भकाला उघड्यावर टाकून देणाऱ्या मातेचा शोध घेण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर उभे ठाकले आहे. रत्नागिरी शहर पोलिसांकडून या प्रकरणाचा कसून तपास सुरू असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात येत आहेत. तसेच घटनास्थळी श्वान पथकही दाखल झाले होते. बाळाच्या मातेसंदर्भात माहिती मिळवण्यासाठी रुग्णालयातील नोंदींचीही तपासणी केली जात आहे. परिसरातील लोकांची चौकशी केली जात आहे. परप्रांतीय लोकांच्या वावरही असल्यामुळे त्यांचीही चौकशी सुरू आहे.

दरम्यान या घटनेने संपूर्ण परिसरात तीव्र संतापाची भावना पसरली असून अशा अमानुष कृत्य करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

Total Visitor Counter

3199550
Share This Article