मुंबई: शेतकरी कर्जमाफी, शेतमजूर, दिव्यांग आणि ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी प्रहार जनशक्ती पक्षाने राज्यभरात चक्का जाम आंदोलन सुरू केलं आहे. अमरावती जिल्ह्यातील परत वाडा येथे आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली हजारो शेतकरी आणि कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत.
शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा या मुख्य मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आले आहे.
परत वाडा-अमरावती महामार्गावर टायर जाळून रास्ता रोको करण्यात आला. शेतकरी, शेतमजूर, दिव्यांग, मच्छीमार, मेंढपाळ यांच्यासह विविध घटकांच्या न्याय्य हक्कांसाठी प्रहार संघटना सरकारविरोधात आक्रमक झाली आहे. बच्चू कडू यांनी सरकारवर टीका करत म्हणाले की, सरकारला राज्यात अशांतता हवी आहे. म्हणूनच कर्जमाफीचा निर्णय घेतला जात नाही.
आता तारीख न सांगता मंत्रालयात घुसू!
आपल्या भाषणात कडू यांनी रोष व्यक्त करत सांगितले की, आता तारीख न सांगता मंत्रालयात घुसू. समिती नेमली पण अध्यक्षाला माहिती नाही. आता गांधीगिरी संपली, भगतसिंग गिरी सुरू झाली आहे. आत्महत्या करण्याऐवजी लढा दिला पाहिजे. कृषिमंत्री विधानभवनात रमी खेळतायत आणि युवक रमी खेळून मरत आहेत. हे फक्त ट्रेलर आहे, पिक्चर अजून बाकी आहे!बच्चू कडू यांनी पुढील आंदोलनाची तारीखही जाहीर केली असून, 29 जुलै रोजी वसंतराव नाईक यांच्या समाधिस्थळी मोठं आंदोलन होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
तारीख न सांगता मंत्रालयात घुसण्याचा बच्चू कडूंचा इशारा, राज्यभरात चक्का जाम आंदोलन
