रत्नागिरी : शहरातील परटवणे मार्गावर एका अज्ञात वाहनाच्या धडकेत गायीचा जागीच मृत्यू झाल्याची घटना १३ जुलै २०२५ रोजी रात्री उशिरा घडली. चिंतामणी हॉस्पिटलसमोर साळवी स्टॉप ते परटवणे रस्त्यावर सुमारे १५० मीटर अंतरावर हा अपघात घडला असून, वाहनचालक घटनास्थळावर न थांबता फरार झाला.
अपघातात मृत झालेली गाय काळसर-तांबूस रंगाची होती. अज्ञात वाहनचालकाने निष्काळजीपणे वाहन चालवून गायीला जोरदार धडक दिली आणि कोणतीही मदत न करता घटनास्थळावरून पळ काढला. धडकेमुळे गायीचा मृत्यू जागीच झाला.
या घटनेबाबत १४ जुलै रोजी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस नाईक बालाजी मच्छिंद्र धुमाळ यांनी फिर्याद दिली असून, अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रत्नागिरी चिंतामणी हॉस्पिटलसमोर वाहनाच्या धडकेत गायीचा मृत्यू; चालकाविरुद्ध गुन्हा
