GRAMIN SEARCH BANNER

कै. नानासाहेब शेट्ये स्मृती पुरस्कारांसाठी प्रस्ताव पाठवण्याचे आवाहन

देवरुख:- कोंडगाव साखरपा येथील थोर समाजसेवक कै. नानासाहेब शेट्ये यांच्या स्मृतीप्रित्यर्थ प्रातिवर्षी व्यक्ती व संस्था पुरस्कार दिले जातात. सिंधूदूर्ग व रत्नागिरी जिल्ह‌यातील सामाजिक, शैक्षणिक, क्रिडा व सांस्कृतिक क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या) व्यक्ती व संस्था यांना स्वतंत्रपणे पुरस्कार दिले जातात.यावर्षी कै.नानासाहेब शेट्ये यांचा ३२ वा स्मृतिदिन दिनांक १ ऑगस्ट २०२५ रोजी ‘नाना शेट्ये सभागृह, साखरपा’ येथे मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे. या मिमित्ताने सन २०२५ साठी कै. नानासाहेब शेट्ये स्मृती व्यक्ती व संस्था पुरस्कारांसाठी योग्य व्यक्ती व संस्था यांचेकडून प्रस्ताव मागविणेत येत आहेत.

ईच्छुकांनी आपले परिपूर्ण प्रस्ताव दि. १४ जुलै २०२५पर्यंत खालील पत्त्यावर पाठवावेत. प्रस्ताव पाठपिणेचा फ्ता – गणपत मारुती शिर्के (कार्याध्यक्ष), मु.पो भडकंबा (साखरपा) पेठवाडी ता. संगमेश्वर जि. रानागिरी पिनः  ४१५८०१ फोन नं- ९४२११४३६१२ / ९१५८०५४४५४ प्रस्ताव पाठवितांना  अध्यक्ष, कै. नानासाहेब शेट्ये स्मारक समिती, साखरपा ) असा उल्लेख करावा. इतर व्यक्तीनीही पुरस्कारासाठी व्यक्ती व संस्था यांची नावे सुचविण्यास हरकत नाही. मात्र सुचविणाऱ्या व्यक्तींनी आपली फोटोसहित माहिती सोबत जोडावी. प्रस्ताव पाठवितांना स्वतंत्र पानावर संपूर्ण माहिती, केलेले काम, मिळालेले यापूर्वीचे विविध पुरस्कार, वर्तमानपत्रातील कात्रणे, आवश्यक फोटो पुरावे हणून जोडावेत.

कै. नानासाहेबा शेट्ये स्मृती पुरस्काराचे स्वरूप शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ, स्मृतीचिन्ह, मानपत्र व रोख रुपये २५००/- असे आहे. तरी ईच्छुकांनी आपले परिपूर्ण प्रस्ताव वर दिलेल्या पत्यावर दि. १४ जुलै २०२५ पर्यंत पोहचतील अशा बेताने पाठवावेत. उशीरा आलेल्या प्रस्तावांचा विचार केला जाणार नाही. तरी ईच्छुकांनी आपले प्रस्ताव वेळेत पाठवावेत असे आवाहन स्मारक समितीचे अध्यक्ष संदेश ऊर्फ बापू शेट्ये, सरचिटणीस संतोष केसरकर, ग्रामिण समितीचे अध्यक्ष दत्ताराम शिंदे गुरुजी, चिटणीस रमाकांत शिंदे, खजिनदार मारुती शिंदे, रमाकांत शेट्ये आदींनी केले आहे.

Total Visitor Counter

2475404
Share This Article