GRAMIN SEARCH BANNER

मंडणगड : महिलेशी लज्जास्पद वर्तन करणाऱ्या वृद्धावर गुन्हा

Gramin Varta
265 Views

मंडणगड : तालुक्यात एका महिलेस धमकी देत लज्जास्पद वर्तन केल्याप्रकरणी संजय बाबूराव राणे (वय 60, रा. साईनगर, मंडणगड) यांच्याविरोधात मंडणगड पोलीस ठाण्यात 11 डिसेंबर 2025 रोजी गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

तक्रारदार महिलेने दिलेल्या माहितीप्रमाणे, 11 डिसेंबर रोजी दुपारी 1.30 ते 2.30 या वेळेत त्या नेहमीप्रमाणे आपल्या कामावर असताना आरोपी राणे त्यांच्या दुकानाजवळ आले. महिलेनं नगरपंचायतीत दिलेल्या तक्रारीबद्दल विचारणा केली असता आरोपीने अश्लील शिवीगाळ करत, “तु मला कोण विचारणारी? तक्रार मागे घ्यायची असेल तर पन्नास हजार रुपये दे,” अशी धमकी दिली.

याचदरम्यान आरोपीने महिलेला लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले, तिच्या अंगावर धावत येत गळ्यातील मंगळसूत्र ओढून तोडले. घटनेच्या वेळी एका व्यक्तीने प्रकार पाहिला. त्यांनी हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न करताच आरोपीने त्यांनाही अश्लील शिवीगाळ केली व “तुमचा काय संबंध? माझ्या मध्ये पडू नका, तुम्हाला संपवून टाकीन,” अशी धमकी दिली.

या प्रकरणी भारतीय न्याय संहिता अधिनियम 2023 चे कलम 74, 131, 352, 351(2) अंतर्गत गुन्हा नोंद झाला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक नितीन गवारे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

Total Visitor Counter

3242908
Share This Article