चिपळूण: गेल्या महिन्यात चिपळूण शहरात हातसफाई केल्यानंतर चोरटे आता पुन्हा सक्रिय झाले आहेत. रविवारी रात्री एक दोन नव्हे तर चक्क 5 ते 7 दुकाने फोडल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. कापसाळ गावातील अनेक ठिकाणी घरफोड्या केल्या आहेत. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कापसाळमधील दुकानखोरी या वाडीतील पाच ते सात घरांना चोरट्यांनी लक्ष्य केले. यातील अनेक घरे बंद अवस्थेत होती. रात्री चोरट्यांनी हातसफाई केल्यानंतर सोमवारी सकाळी चोरीची घटना उघडकीस आली. दुकाने फोडल्याची घटना कळताच ग्रामस्थांमध्ये खळबळ उडाली. तात्काळ चिपळूण पोलिसांना कळवण्यात आले. सध्या चोरी झालेल्या घरांमध्ये पंचनामा करण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे एकूण किती घरांमध्ये चोरट्यांनी डल्ला मारला आहे. किती लाखांचा ऐवज गेला आहे? दागिन्यांची चोरी झाली आहे? या सर्वाचा तपास सुरू आहे. हे आज दुपारपर्यंत स्पष्ट होईल. मात्र, या घटनेमुळे चिपळूणच्या ग्रामीण भागात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे पोलिसांसमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे.
ब्रेकिंग: चिपळुणात खळबळ : चोरट्यांचा पुन्हा धुमाकूळ; 5 ते 7 ठिकाणी घरे फोडली
