GRAMIN SEARCH BANNER

लांजा : रावारीतील सुशांत आगरेला नॅशनल पॉवरलिफ्टिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत सुवर्णपदक

Gramin Varta
6 Views

लांजा : तालुक्यातील रावारी गावचा सुपुत्र सुशांत सोनू आगरे याने छत्तीसगड येथे झालेल्या नॅशनल पॉवरलिफ्टिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत ६७.५ किलोग्रॅम वजनी गटात २२५ किलो वजन उचलून सुवर्णपदक पटकावले. तसेच “स्ट्रॉंग मॅन” म्हणून देखील त्याने किताब मिळवला आहे.

सुशांत आगरेच्या या यशामुळे संपूर्ण लांजा तालुक्याचे नाव देशभर उजळले आहे. आर्थिक परिस्थिती नसताना देखील त्याने केबल प्रबळ इच्छाशक्ती, जिद्द, चिकाटी, सातत्य आणि परिश्रमाच्या जोरावर त्याने हे यश संपादन केले आहे.

३१ जुलै ते ३ ऑगस्ट २०२५ दरम्यान छत्तीसगड, बिलासपूर येथे झालेल्या या स्पर्धेत देशभरातील नामांकित खेळाडूंमध्ये सुशांतने आपली छाप पाडली. त्याने आपल्या वजनी गटात सर्वाधिक वजन उचलून सुवर्ण पदकावर आपले नाव कोरले.

याशिवाय, येत्या २८ नोव्हेंबर २०२५ रोजी आसामच्या गुवाहाटी येथे होणाऱ्या वर्ल्ड पॉवरलिफ्टिंग चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी सुशांत आगरे याची भारतीय संघात निवड झाली आहे. विशेष म्हणजे, यापूर्वीही सुशांतने अनेक राष्ट्रीय स्तरावरील पदकं पटकावली असून, पॉवरलिफ्टिंग क्षेत्रात त्याने सातत्यपूर्ण मेहनतीने भक्कम स्थान निर्माण केले आहे. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल सर्व स्तरातून सुशांत आगरेचे कौतुक होत आहे.

Total Visitor Counter

2651840
Share This Article