रत्नागिरी: सावर्डे पोलीस ठाण्याच्या हद्दीत मुंबई-गोवा महामार्गावरील खेरशेत, माथेवाडीजवळ असलेल्या पंचामृत हॉटेल परिसरात चोरीची घटना उघडकीस आली आहे. दि. १५ सप्टेंबर २०२५ रोजी रात्री ११.३० ते ११.५५ वाजण्याच्या सुमारास ही चोरी घडली असून, अज्ञात चोरट्याने सुमारे १५ हजार रुपये किंमतीचा मोबाईल फोन चोरून नेला आहे.
या प्रकरणी ठाणे येथील रहिवासी असलेल्या स्टेफी विनसेन्ट फर्नाडिस (वय ३२) यांनी सावर्डे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या तक्रारीनुसार, पंचामृत हॉटेल, मुंबई-गोवा हायवे, खेरशेत, माथेवाडीजवळ, ता. चिपळूण येथे असताना त्यांच्या संमतीशिवाय आणि लबाडीच्या इराद्याने अज्ञात इसमाने सॅमसंग कंपनीचा ‘एफ १५’ मॉडेलचा पांढऱ्या रंगाचा मोबाईल चोरून नेला आहे.
या घटनेची फिर्याद दि. ०१ ऑक्टोबर २०२५ रोजी रात्री ९.१४ वाजता सावर्डे पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध भारतीय दंड संहिता कलम ३०३(२) नुसार गुन्हा क्र. ९६/२०२५ नोंदवला आहे.