रत्नागिरी : केरळ येथील रोशन बेगम मोहम्मद कृतबुद्दीन (55) या महिलेचा सिव्हिल हॉस्पिटल रत्नागिरी येथे 20 जून रोजी सकाळी 10.30 वाजता उपचारादरम्यान मृत्यू झाला.
मयत महिला 19 जून 2025 रोजी दुपारी 3.17 वाजेच्या सुमारास रेल्वे मधून प्रवास करत असताना कोच क्रमांक 54, सीट क्रमांक 52 वर बेशुद्ध अवस्थेत आढळली होती. रेल्वे पोलीस, चिपळूण रेल्वे मेडिकल स्टाफ यांनी तिला चिपळूण रेल्वे स्टेशन येथे उतरवून 108 रुग्णवाहिकेतून उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय कामथे, ता. चिपळूण येथे दाखल केले. अधिक उपचारांसाठी तिला 20 जून रोजी रात्री 2.25 वाजता सिव्हिल हॉस्पिटल रत्नागिरी येथे दाखल करण्यात आले. येथील आय.सी.यू. विभागात उपचार सुरू असताना तिचा मृत्यू झाला.
या प्रकरणाची रत्नागिरी शहर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
रत्नागिरी : रेल्वेत बेशुद्धावस्थेत आढळलेल्या वृद्धेचा जिल्हा रुग्णालयात मृत्यू
