चिपळूण: चिपळूण आगारात नव्याने दाखल झालेल्या पाच एस. टी. बसेसचा लोकार्पण सोहळा नुकताच माजी मंत्री आमदार भास्करशेठ जाधव यांच्या हस्ते संपन्न झाला. याप्रसंगी आमदार शेखर निकम, माजी सभापती शौकतभाई मुकादम, पूजाताई निकम, जयद्रथ खताते, नितीन ठसाळे, दिशा दाभोळकर आणि आगार व्यवस्थापक श्री. चव्हाण यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. या नवीन बसेसमुळे प्रवाशांना अधिक चांगल्या सुविधा मिळतील तसेच चिपळूण आगाराच्या कार्यक्षमतेतही वाढ होईल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
चिपळूण आगाराला ५ नवीन बसेस; भास्कर जाधव यांच्या हस्ते लोकार्पण
