मुंबई:राज्य शासनाने नागरिकांची eKYC प्रक्रिया अधिक सुलभ आणि डिजिटल पद्धतीने पूर्ण करण्यासाठी दोन विशेष मोबाइल ॲप्स सादर केले आहेत. यामध्ये “Aadhaar Face RD Service app” आणि “Mera E-KYC app” यांचा समावेश आहे. हे दोन्ही ॲप्स गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध असून, याच्या सहाय्याने नागरिक घरबसल्या eKYC करू शकतील.
या प्रक्रियेसाठी सर्वप्रथम “Aadhaar Face RD Service” ॲप गुगल प्ले स्टोअरवरून डाउनलोड करून आपल्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करावे लागेल. त्यानंतर “Mera E-KYC” ॲप देखील इन्स्टॉल करावे.
ॲप उघडल्यानंतर राज्य व ठिकाण निवडावे. आधार क्रमांक भरल्यानंतर संबंधित मोबाईलवर OTP प्राप्त होईल. तो OTP दिलेल्या रकान्यात भरून ‘सबमिट’ करावे. सबमिट केल्यानंतर स्क्रीनवर दाखवलेली माहिती योग्य असल्याची खात्री करून पुढे प्रक्रिया करावी.
यानंतर फेस eKYC वर क्लिक करताच सेल्फी कॅमेरा उघडेल. यावेळी मोबाईलच्या सूचनांनुसार डोळे बंद करून उघडावे. चेहऱ्याचा फोटो घेतल्यानंतर eKYC प्रक्रिया पूर्ण होईल आणि याची पुष्टी करणारा मेसेज स्क्रीनवर दिसेल.
शासनाच्या या उपक्रमामुळे नागरिकांची आधारसंबंधित पडताळणी प्रक्रिया अधिक सोपी, सुरक्षित आणि त्वरित झाली आहे.
आता इ- केवायसी करा या दोन ॲप वरून
