GRAMIN SEARCH BANNER

खेडमध्ये घरफोडून सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम लंपास

Gramin Varta
10 Views

खेड : तालुक्यातील बोरज येथील घोसाळकरवाडी येथे एका सेवानिवृत्त व्यक्तीच्या घरातून सुमारे ४१,५०० रुपये किमतीचा ऐवज चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली आहे. १५ जुलै रोजी रात्री १० वाजल्यापासून ते १६ जुलै रोजी सकाळी ८ वाजेपर्यंतच्या दरम्यान ही चोरी झाली असून, अज्ञात चोरट्यांविरोधात खेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कमलाकर गोविंद घोसाळकर (वय ६६, रा. बोरज, घोसाळकरवाडी, खेड, जि. रत्नागिरी) हे सेवानिवृत्त असून, त्यांच्या राहत्या घरातून ही चोरी झाली आहे. चोरट्यांनी त्यांच्या घरातून चांदीच्या देवतांच्या मूर्ती, सोन्याचे कानातले आणि रोख रक्कम लंपास केली.

चोरीला गेलेल्या वस्तूंमध्ये दत्त देवतेची चांदीची उभी मूर्ती: अंदाजे १०० ग्रॅम वजनाची, किंमत सुमारे ८,००० रुपये. गणपती देवतेची चांदीची बैठ मूर्ती: अंदाजे १०० ग्रॅम वजनाची, किंमत सुमारे ८,००० रुपये. कानातील सोन्याच्या कुड्या: अंदाजे ५ ग्रॅम वजनाच्या, सुमारे २० वर्षांपूर्वी बनवलेल्या, किंमत सुमारे २०,००० रुपये. रोख रक्कम: ५०० रुपयांच्या दराच्या १० नोटा, एकूण ५,००० रुपये  सोन्याचे पॉलिश केलेला नकली हार: किंमत सुमारे ५०० रुपये. एकूण ४१,५०० रुपये किमतीचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला आहे.

याप्रकरणी फिर्यादी कमलाकर घोसाळकर यांनी १६ जुलै २०२५ रोजी रात्री १०.३४ वाजता खेड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. खेड पोलिस अज्ञात आरोपींचा शोध पोलिस घेत असून, या घटनेमुळे परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

Total Visitor Counter

2646831
Share This Article