लांजा : बेशिस्तपणे वाहन चालवणे व वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या २४५ वाहनचालकांवर लांजा पोलिसांनी दंडात्मक कारवाई करत चांगलाच दणका दिला. जुलै महिन्यात करण्यात आलेल्या कारवाईत पोलिसांनी २ लाख ५१ हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे.
लांजा शहरांमध्ये उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. या कामामुळे दुतर्फा असलेल्या अरुंद रस्त्याच्या बाजूला वाहने उभी करण्यास बंदी घालण्यात आली आहे. मात्र, तरीही ‘नो पार्किंग’मध्ये वाहने उभी करण्याचे प्रकार सुरू आहेत. या वाहनांमुळे वाहतुकीला अडथळा होत असल्याने पोलिसांनी वाहनचालकांवर दंडात्मक कारवाईचा बडगा उगारला.
जुलै महिन्यामध्ये लांजाचे पोलिस निरीक्षक नीळकंठ बगळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार साक्षी भुजबळराव व पोलिस शिपाई किशोर पवार यांनी शहरातील बेशिस्त २४५ वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई केली. त्यांच्याकडून एका महिन्यात २ लाख ५१ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
तसेच कोर्ले फाटा ते बोरिवले पर्यंत जाणाऱ्या राज्यमार्गावर दारू पिऊन चिरे वाहतूक करणाऱ्या २ वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.
लांजा वाहतूक पोलिसांचा दणका; नियमांचे उल्लंघन करणाऱ्या २४५ वाहनचालकांकडून अडीच लाखांचा दंड वसूल
