प्रशांत पोवार / राजापूर
फोटोग्राफर-व्हिडीओग्राफर असोसिएशन, राजापूर तालुका यांची वार्षिक बैठक रविवार, २० जुलै २०२५ रोजी पाचल येथील एका स्टुडिओमध्ये पार पडली. यावेळी असोसिएशनच्या नूतन कार्यकारिणीची निवड एकमताने करण्यात आली. अध्यक्षपदी कलिम मुल्ला यांची निवड करण्यात आली आहे.
बैठकीच्या सुरुवातीला सचिवांनी मागील सभेचे इतिवृत्त वाचून दाखवले. त्यानंतर माजी अध्यक्षांनी उपस्थितांचे स्वागत केले. यानंतर कार्यकारिणी निवडीस प्रारंभ झाला. मागील कार्यकारिणीची मुदत संपल्याने २०२५ साठी नवीन कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली.
नूतन कार्यकारिणी पुढीलप्रमाणे
अध्यक्ष: कलिम मुल्ला
उपाध्यक्ष: प्रितेश देवळेकर, लियाकत सारंग
कार्याध्यक्ष: सचिन बने
सचिव: संदेश टिळेकर
सहसचिव: राजेश खांबल
खजिनदार: चंद्रशेखर माणिक
सहखजिनदार: महेश पांचाळ
सदस्य: अक्षय सोगम, प्रसाद पाखरे
सल्लागार: चारूदत्त नाखरे, सुहास कोंडेकर
बैठकीत येणाऱ्या १९ ऑगस्ट २०२५ – जागतिक छायाचित्रण दिनाचे नियोजन करण्याबाबतही चर्चा करण्यात आली. यानंतर नूतन अध्यक्ष आणि कार्यकारिणी सदस्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
फोटोग्राफर-व्हिडीओग्राफर असोसिएशन राजापूर तालुक्याची नूतन कार्यकारिणी जाहीर, अध्यक्षपदी कलिम मुल्ला
