रत्नागिरी : युवा संदेश प्रतिष्ठान यांच्यावतीने यावर्षीही रत्नागिरी जिल्ह्यातील शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या उपक्रमशील शिक्षकांना “युवा संदेश आदर्श शिक्षक पुरस्कार 2025” ने सन्मानित करण्यात येणार आहे.
या पुरस्कारासाठी कोणताही प्रस्ताव न मागवता, विद्यार्थी, पालक व ग्रामस्थांशी थेट संवाद साधून आणि युवा संदेश प्रतिष्ठानच्या तज्ज्ञ समितीने केलेल्या अभ्यासपूर्ण निरीक्षणातून गुणवंत शिक्षकांची निवड करण्यात आली आहे.
यावर्षी 2025 साठी जाहीर करण्यात आलेले पुरस्कारप्राप्त शिक्षक पुढीलप्रमाणे:
🔹 प्राथमिक विभाग:
श्री. आशिष खेमा सावंत
जिल्हा परिषद शाळा, पूर्णगड खारवीवाडा, ता. व जि. रत्नागिरी
🔹 माध्यमिक विभाग:
श्री. अजय विजय आगरे (सहायक शिक्षक)
न्यू इंग्लिश स्कूल व तु. पु. शेट्ये कनिष्ठ महाविद्यालय, लांजा, जि. रत्नागिरी
या गुणवंत शिक्षकांचा सत्कार रविवार, 20 जुलै 2025 रोजी स्वामी समर्थ मंगल कार्यालय, साळवी स्टॉप, रत्नागिरी येथे आयोजित सिंधुरत्न टॅलेंट सर्च परीक्षा (STS) च्या बक्षीस वितरण समारंभात मान्यवरांच्या हस्ते केला जाणार आहे.
हे पुरस्कार वितरणाचे दुसरे वर्ष असून, त्यामध्ये शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र व रोख रक्कम यांचा समावेश आहे.
या मानाच्या पुरस्कारासाठी निवड झाल्याबद्दल मा. सौ. संजना संदेश सावंत (माजी जि.प. अध्यक्ष, सिंधुदुर्ग) व मा. श्री. संदेश उर्फ गोट्या सावंत (संस्थापक अध्यक्ष, युवा संदेश प्रतिष्ठान) यांनी सत्कारमूर्तींचे अभिनंदन करून पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
दरम्यान सदर कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन रत्नागिरी जिल्हा समन्वयक श्रीधर दळवी,रत्नागिरी प्रतिनिधी उमेश केसरकर, विशाल मोरे, सुहास वाडेकर आदिनी केले आहे.
उपक्रमशील शिक्षकांचा “युवा संदेश आदर्श शिक्षक पुरस्काराने” गौरव
