GRAMIN SEARCH BANNER

खेडमध्ये रस्त्यालगतचा बांध कोसळला

Gramin Search
13 Views

खेड :तालुक्यातील कळंबणी खुर्द येथील रस्त्यालगतचा बांध खचल्याने वाहतुकीस अडसर निर्माण झाला आहे. रस्त्याच्या खालीदेखील बांध खाचण्याची शक्यता आहे. यामुळे वाहतूक पूर्णपणे ठप्प होण्याची शक्यता आहे. ग्रामस्थांनाही ये-जा करताना जीव मुठीत धरून मार्गक्रमण करावे लागत आहे.
 
याठिकाणी 18 कि.मी. अंतरापर्यंत संरक्षक भिंत उभारण्याची मागणी ग्रामस्थांनी सातत्याने केली होती. मात्र या मागणीकडे कानाडोळा करण्यात आला आहे. बांध खचल्याने नजीकच्या घरांना देखील धोका निर्माण झाला आहे. रस्त्याच्या खाली बांध खाल्यास वडगावला जाणारी एसटी बससेवा कायमची बंद होवून विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांना फटका बसणार आहे. प्रशासनाने ही बाब गांभीर्याने घेवून याठिकाणी आवश्यक त्या उपाययोजनांचा अवलंब करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

Total Visitor Counter

2647335
Share This Article