चिपळूण : कोळकेवाडी, पाथरवाडी येथील गणेश नारायण काजवे (वय ३०) या तरुणाचा दारूच्या नशेत शेतातील बांधावरून पडून बेशुद्ध झाल्यानंतर, सातारा जिल्ह्यातील कराड येथील कृष्णा हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना ८ मार्च २०२५ रोजी सायंकाळी ६.०१ वाजता घडली, मात्र याची नोंद २५ जून २०२५ रोजी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ६ मार्च २०२५ रोजी गणेश काजवे दारूच्या अमलाखाली असताना आपल्या गावाच्या हद्दीतील शेतात होते. त्याचवेळी ते शेताच्या बांधावरून खाली पडले आणि बेशुद्ध अवस्थेत आढळून आले.
गणेशला तात्काळ उपचारासाठी कराड येथील कृष्णा हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. डॉक्टरांनी त्याच्यावर उपचार सुरू केले, परंतु उपचारादरम्यानच ८ मार्च २०२५ रोजी सायंकाळी ६.०१ वाजता गणेश काजवे यांचा मृत्यू झाला. या घटनेची नोंद रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून करण्यात आली आहे.
चिपळूण : दारूच्या नशेत बांधावरून पडून तरुणाचा मृत्यू

Leave a Comment