GRAMIN SEARCH BANNER

पाटगाव येथील दिपक नटे नामक तरूण बेपत्ता

देवरूख- देवरूख नजीकच्या पाटगाव येथील तरूण बेपत्ता झाला आहे. पती बेपत्ता झाल्याची तक्रार त्याच्या पत्नीने देवरूख पोलीस ठाण्यात दिली आहे. दिपक सुरेश नटे (वय-४३) असे बेपत्ता झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

याबाबत देवरूख पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिपक नटे याला दारूचे व्यसन असून तो दि. १५ जुलै रोजी सकाळी ८.३० वा. कोणालाही न सांगता घरातून निघून गेला आहे. तो घरी न आल्याने घरातील मंडळींनी त्याची शोधाशोध करूनही तो कुठेच सापडला नाही. अखेर त्याची पत्नी दिपाली हिने पती बेपत्ता असल्याची तक्रार देवरूख पोलीस ठाण्यात दिली आहे. दिपक याची उंची ५ फुट ६ इंच असून रंग गोरा, मध्यम बांधा, चेहरा गोल व घरातून निघतेवेळी शेवाळी रंगाचा फुल शर्ट व पँन्ट परिधान केली आहे. अशा वर्णनाची व्यक्ती कुठे आढळल्यास देवरूख पोलीस ठाण्याशी संपर्क साधण्याचे आवाहन देवरूख पोलीसांनी केले आहे. तपास पो. ह. संदीप जाधव करत आहेत.

Total Visitor Counter

2455556
Share This Article