राजापूर : तालुक्यातील कळसवली येथे चोरट्यांनी घरफोडी करून पितळेची व तांब्याची भांडी चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. १६ जून २०२५ ते ५ ऑगस्ट २०२५ या कालावधीत ही चोरी घडली असून, चोरी गेलेल्या वस्तूंची किंमत सुमारे ८ हजार ७०० रुपये आहे. याप्रकरणी राजापूर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, नंदिनी भास्कर बागाव (वय ६६, मूळ रा. कळसवली, सध्या रा. गिरगाव, मुंबई) यांच्या ‘श्री कृपा’ बंगल्याच्या दरवाज्याची ग्रॅनाईट चौकट उचकटून चोरट्यांनी घरात प्रवेश केला. देवघरातील कपाट व किचनमधील पितळी-तांब्याच्या भांड्यांवर चोरट्यांनी हात साफ केला. चोरी गेलेल्या भांड्यांमध्ये तपेले, परात, हंडा, कळशी आणि धातूचे निरंजन यांचा समावेश आहे.
या प्रकरणी ७ ऑगस्ट रोजी दुपारी ३.५५ वाजता भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला असून, पुढील तपास राजापूर पोलिसांकडून सुरू आहे
संसारी चोर; घरफोडी करून तांब्या-पितळेची भांडी चोरली
