GRAMIN SEARCH BANNER

माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष ॲड.जमीर खलिफे यांच्यातर्फे महावितरण कर्मचाऱ्यांना रेनकोट वाटप

Gramin Search
3 Views

राजापूर :- राजापूर शहर व तालुक्यातील वीजपुरवठा अखंडीतपणे सुरू रहावा, याकरीता भर पावसात दिवसरात्र मेहनत घेणाऱ्या महावितरणाच्या कर्मचाऱ्यं राजापूरचे माजी नगराध्यक्ष ॲड.जमीर खलिफे यांच्यातर्फे रेनकोट वाटप करण्यात आले. 

राजापूर शहर व तालुक्यात महावितरणचे कर्मारी चांगल्या पध्दतीने काम करत आहेत. तालुक्याच्या भौगोलिक रचनेचा विचार करता पावसाळ्यात वादळी पावसात महावितरणला मोठा फटका बसतो. अनेक ठिकाणी विजवाहीन्यांवर झाडे पडून वाहीन्यांसह वीजखांबही मोडून पडतात. अशावेळी महावितरणचे कर्माचारी पावसाची तमा न बाळगता दिवसरात्र मेहनत करून वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न करत असतात. यातील बहुतांश कर्मचारी हे कंत्राटी पध्दतीने अल्प मानधनावर काम करत आहेत. 

त्यामुळे त्यांच्या या कामी दखल घेवून भर पावसात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी रेनकोट देण्याची संकल्पना सामाजिक कार्यकर्ते विनायक कदम यांनी माजी नगराध्यक्ष ॲड.जमीर खलिफे यांच्याकडे मांडली. त्यानुसार ॲड.खलिफे यांनी तत्काळ महावितरणाया कर्मचाऱ्यांना रेनकोट भेट म्हणून दिले आहेत. यामध्ये त्यांनी राजापूर शहरातील कर्मचाऱ्यांना 12 तर तालुक्यातील कर्मचाऱ्यांना 10 असे एकूण 22 रेनकोट दिले आहेत. नुकतेच या रेनकोटचे वाटप ॲड.खलिफे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शहरअध्यक्ष अजीम जैतापकर, महावितरणचे अभियंता जमीर तांबोळी यांच्यासह कर्मारी उपस्थित होते. ॲड.खलिफे यांनी कर्मचाऱ्यांच्या कामाची जाण ठेवत रेनकोट दिल्याबद्दल महावितरणचे कर्मचारी तसेच अभियंता श्री.तांबोळी यांनी ॲड.खलिफे यांना धन्यवाद दिले आहेत.

Total Visitor Counter

2648469
Share This Article