रत्नागिरी : येत्या ६ जुलै रोजी मुग्धनाद प्रस्तुत भैरवी रागावर आधारित इतिश्री ही गजानन भट स्मृती मैफल आयोजित करण्यात आली आहे.
इतिश्री ही शास्त्रीय, उपशास्त्रीय, अभंग, नाट्यगीत आणि चित्रपट संगीताची मैफल असून त्यामध्ये मुग्धा भट-सामंत आणि मुग्धनाद संगीत अकादमीचे विद्यार्थी सहभागी होणार आहेत.
त्यांना तबलासाथ केदार लिंगायत, तर हार्मोनियम साथ चैतन्य पटवर्धन करणार आहेत. मंगेश चव्हाण पखवाज साथ, तर अवधूत आंबेरकर ऑक्टोपॅडची साथ करणार आहेत. सिंथेसायझरची बाजू राजू किल्लेकर सांभाळणार आहेत. मैफलीचे निवेदन दीप्ती कानविंदे करणार असून ध्वनिव्यवस्था उदयराज सावंत यांची आहे.ही मैफल रविवार, दि. ६ जुलै रोजी पहाटे ४ वाजता सुरू होणार आहे. थिबा पॅलेस रोडवरील जयेश मंगल कार्यालयात होणार असलेल्या मैफलीला रसिकांनी आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.
रत्नागिरीत ६ जुलैला भैरवी रागावर आधारित इतिश्री मैफल
