GRAMIN SEARCH BANNER

श्री क्षेत्र मार्लेश्वर येथे आज स्वच्छता मोहीम

Gramin Search
2 Views

देवरुख: जागतिक योग दिनानिमित्ताने श्रीक्षेत्र मार्लेश्वर येथे शनिवारी २१ जून रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये प्रामुख्याने स्वच्छता मोहिमेचा समावेश आहे.

देवरुख पोलीस ठाणे, राजू काकडे हेल्प ॲकॅडमी, संगमेश्वर तालुक्यातील पोलीस पाटील, तसेच आपलं देवरूख, सुंदर देवरूख यांच्या संयुक्त विद्यमाने हे उपक्रम होणार आहेत. सकाळी ७.३० वाजता श्री क्षेत्र मार्लेश्वर येथे पायथ्यापासुन स्वच्छता मोहीम राबवण्यात येणार आहे.

जागतिक योग दिनानिमित्त योगाबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे. मार्लेश्वर परिसरात वृक्षारोपण केले जाणार आहे. राजू काकडे हेल्प ॲकॅडमीतर्फे आपत्कालीन व्यवस्थापनाअंतर्गत काही प्रात्यक्षिके दाखवली जाणार आहेत. सहभागी सर्वांसाठी सकाळी अल्पोपाहार, दुपारी भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे.

या उपक्रमात सहभागी होऊ इच्छिणार्‍यांनी युयुत्सु आर्ते व सागर मुरूडकर यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Total Visitor Counter

2649063
Share This Article