GRAMIN SEARCH BANNER

रत्नागिरी चर्मालय येथे दुचाकीची पादचाऱ्यास धडक, दोघे जखमी

Gramin Varta
125 Views

रत्नागिरी : शहरातील चर्मालय येथे झालेल्या अपघातात एक पादचारी जखमी झाला असून, संबंधित दुचाकीस्वारावर शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सफवान जिकीर बोरकर (वय 26, रा. कोकणनगर, रत्नागिरी) असे संशयित दुचाकीस्वाराचे नाव आहे. ५ नोव्हेंबर रोजी रात्री सुमारास आठ वाजता सफवान हा बुलेट दुचाकी (क्रमांक MH-08 BD-4706) घेऊन चर्मालयहून कोकणनगरच्या दिशेने जात असताना ही घटना घडली.

यावेळी रस्त्याने चालत जाणाऱ्या रामनिहोर छोटेलाल पटेल (वय 40, रा. रायपूर, मध्य प्रदेश) याला दुचाकीची जोरदार धडक बसली. या अपघातात पटेल हे गंभीर जखमी झाले असून, सफवान बोरकर हा देखील किरकोळ जखमी झाला आहे.

या घटनेची नोंद रत्नागिरी शहर पोलिस ठाण्यात करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे.

Total Visitor Counter

3366906
Share This Article