GRAMIN SEARCH BANNER

संगमेश्वर : शेकोटी घेताना महिला भाजून जखमी

Gramin Varta
326 Views

संगमेश्वर : तालुक्यातील आंबवली येथे बुधवारी (ता. १२) सकाळी शेकोटी घेताना गाऊनला आग लागल्याने एक महिला गंभीर भाजल्याची घटना घडली. मुमताज मुनवर पाटणकर (वय ५२, रा. आंबवली, देवरुख) असे भाजलेल्या महिलेचे नाव आहे.

घराजवळ पाला-पाचोळा गोळा करून त्या शेकोटी घेत होत्या, त्यावेळी त्यांच्या कपड्यांना आग लागली. यात त्या ६० टक्के भाजल्या. त्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी त्यांना कोल्हापूर येथे हलविण्यात आले असल्याची माहिती पोलिसांनी दिली

Total Visitor Counter

3366872
Share This Article