खेड : शहरातील देवणं पुलावर मंगळवारी रात्री पोलिसांनी केलेल्या कारवाईत एका रिक्षाचालकाला गांजा ओढताना रंगेहाथ पकडण्यात आले. अमली पदार्थविरोधी मोहिमेत मिळालेल्या या यशामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भोस्ते-जलालशहा मोहल्ला येथील अस्लम उस्मानगणी भालदार (वय ४५) हा रात्री सुमारे आठच्या सुमारास पुलावर उभा राहून गांजा सेवन करताना आढळला. पोलीस निरीक्षक विवेक अहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने तात्काळ धाड टाकून त्याला ताब्यात घेतले.
त्याच्याकडून नेमका गांजा कुठून मिळवला, याचा तपास सुरू असून, पोलीस कॉन्स्टेबल शिरीष साळुंखे यांनी खेड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
खेडमध्ये गांजा सेवन करताना रिक्षाचालकाला रंगेहाथ पकडले
