GRAMIN SEARCH BANNER

रत्नागिरी जिल्ह्यात दीड दिवसांच्या लाडक्या गणरायाला निरोप

13 हजार 834 घरगुती तसेच 7 सार्वजनिक गणपतींचे विसर्जन

रत्नागिरी : जिल्ह्यात दीड दिवसांच्या गणपती बाप्पांना गुरुवारी भक्तीमय वातावरणात निरोप देण्यात आला. तब्बल 13 हजार 834 घरगुती तसेच 7 सार्वजनिक गणपतींचे विसर्जन करण्यात आले. सकाळपासूनच शहरासह ग्रामीण भागात विसर्जन मिरवणुका निघाल्या होत्या. ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ या गजराने संपूर्ण वातावरण दुमदुमून गेले. विसर्जन मिरवणुकांदरम्यान ढोल-ताशांचा गजर, लेझीम आणि फटाक्यांची आतषबाजी रंगत आणत होती. महिला, युवक तसेच बालगोपाळांनीही मोठ्या उत्साहात सहभाग घेतला.

Total Visitor Counter

2474854
Share This Article