खेड: खेड तालुक्यातील धामणंद-गावठण येथे दारूच्या व्यसनातून एका ३५ वर्षीय तरुणाने शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. राहुल राजाराम खैर (वय ३५) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुल खैर याला दारू पिण्याचे व्यसन होते. त्याच्या या व्यसनामुळे त्याची पत्नी मुलांसह माहेरी राहण्यास गेली होती. राहुल घरी एकटा असताना, दारूच्या नशेत त्याने नायलॉनच्या दोरीने गळफास लावून आपले जीवन संपवले.
या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. तपासणीनंतर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून, घटनेमागचे नेमके कारण आणि पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. या घटनेमुळे धामणंद परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.