GRAMIN SEARCH BANNER

लांजा तालुका बौद्धजन संघटनेचे पदाधिकारी आ. किरण सामंत यांच्या उपस्थितीत शिवसेनेत दाखल; पक्ष संघटनेला नवी ताकद

Gramin Varta
22 Views

लांजा/ सिकंदर फरास: लांजा तालुका बौद्धजन संघटनेचे उपाध्यक्ष लहू कांबळे यांच्यासह तालुक्यातील विविध बौद्धजन संघटनांचे शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी आज आमदार किरण सामंत यांच्या उपस्थितीत शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. या महत्त्वपूर्ण पक्षप्रवेशामुळे लांजा तालुक्यातील शिवसेना संघटनेला नवी ताकद मिळाली असून, यामुळे राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

लांजा तालुका बौद्धजन संघटनेचे उपाध्यक्ष लहू कांबळे यांनी आपल्या सहकाऱ्यांसह शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी आमदार किरण सामंत यांनी नवागत कार्यकर्त्यांचे पक्षात स्वागत केले. पक्ष संघटन बळकट करण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे काम करावे, असे आवाहन सामंत यांनी केले.


यावेळी बोलताना आमदार किरण सामंत यांनी लहू कांबळे यांच्या पक्षप्रवेशाचे महत्त्व अधोरेखित केले. सामंत म्हणाले, “लहू कांबळे हे केवळ राजकारणासाठी नव्हे, तर लांजा शहराच्या सर्वांगीण विकासासाठी शिवसेनेत आले आहेत. विकासाच्या माध्यमातून शहरातील प्रत्येक घटकाचा सहभाग वाढवणे हेच त्यांचे ध्येय आहे.” शहरात विविध विकासकामे सुरू असून, नागरिकांनी एकजुटीने शिवसेनेच्या माध्यमातून ही कामे पुढे नेण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

लहू कांबळे यांच्या नेतृत्वाखाली लांजा शहराच्या विकासाची धुरा अधिक वेगाने पुढे जाईल, असा विश्वास यावेळी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केला. लहू कांबळे यांच्या समवेत लांजा रिक्षा चालक-मालक संघटनेच्या सदस्यांनीही आमदार सामंत यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. यामुळे शहराच्या वाहतूक क्षेत्रातील एक मोठा घटक आता शिवसेनेशी जोडला गेला आहे.

झालेल्या या मोठ्या पक्षप्रवेश सोहळ्यात लांजा ग्रामस्थ बौद्धजन मंडळ, ग्रामीण बौद्धवाडीचे माजी अध्यक्ष दिलीप कांबळे, माजी अध्यक्ष आनंद कांबळे, सुदेश कांबळे (अध्यक्ष), मोहन कांबळे (अध्यक्ष, मधली वाडी), राजेंद्र कांबळे (उपाध्यक्ष), विशाल पवार (सेक्रेटरी) यांच्यासह संदीप कांबळे, राजन कांबळे, किशोर कांबळे, संदेश कांबळे, अंकुश कांबळे, नागेश कांबळे, बबन कांबळे, तुषार कांबळे, सिद्धार्थ कांबळे, भीमराज कांबळे, महेंद्र कांबळे, माणिका कांबळे, प्रकाश कांबळे, चंद्रकांत कांबळे, दिनेश कांबळे, अनंत कांबळे, सिकंदर कांबळे, चंद्रगुप्त कांबळे, पांडुरंग कांबळे, प्रवीण कांबळे, अमोल पडवळ, गणपत कांबळे, सागर कांबळे, प्रजन कांबळे, केशव कांबळे, अरुण कांबळे, मुन्ना बाळू रंगी, पैगंबर नाईक, सुजल कांबळे, सखाराम कांबळे, अनिल कांबळे, संतोष जाधव, बाळकृष्ण, साहिल झोरे, संतोष झोरे, सौरभ, प्रसाद कांबळे, गौतम कांबळे, तुषार माने, साई बाळूरंगी आणि मुस्लिम समाजाचे मनमुली मौका साब मनमुली, रियाज मन मुली, कुतुब मनमुली, मेहबूब सुबड, सलीम सुबड, रियाज सुबड, बाजी कांबळे, हजार मनखायान, नितीन कांबळे, नवनीत कांबळे, संजय कांबळे, प्रितेश कांबळे, रवी कांबळे आणि ॲडव्होकेट रुपेश कांबळे अशा शेकडो पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी शिवसेना पक्षात प्रवेश केला.

यावेळी विधानसभा क्षेत्र प्रमुख राजू कुरूप, तालुकाप्रमुख गुरुप्रसाद देसाई, विकास शेटे, एस. एन. कांबळे, सचिन डोंगरकर, नितीन शेट्टी, मुन्ना खामकर, प्रसाद माने, बाबा भिंगार्डे, सुजित आंबेकर, प्रसन्न शेटे, दिनेश पवार, नंदराज कुरूप, प्रसाद भाई शेट्ये यांच्यासह सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Total Visitor Counter

3072292
Share This Article