कल्याण : दरवर्षी प्रमाणे याही वर्षी “कल्याण नगरीचे वैभव” व अतिशय जागृत स्थान म्हणून प्रसिद्ध पावलेल्या “श्री संत राममारुती महाराज यांच्या १०७ व्या पुण्यतिथी उत्सवास महाराजाचे चैतन्यदायी समाधीस्थानी सोमवार दि. ८ सप्टेंबर रोजी असंख्य भक्तांच्या मंगलदायी उपस्थितीत अतिशय श्रध्दा-प्रेम-भक्तिभावाने शानदार प्रारंभ झाला.
सतत ८ दिवस सुरु असणाऱ्या या पुण्यतिथी उत्सवाचे निमित्ताने समाधीस्थानी दररोज नामांकित भजनी मंडळांची भजने, कीर्तने, भक्तिगीते, भारूड, गोंधळ, जोगवा यांचे भव्य आयोजन करण्यांत आले असून विविध धार्मिक संस्थांतर्फे समाधीवर अभिषेक व पंचामृत महापूजा, संपूर्ण उत्सव काळात होणार असून अनेक धार्मिक, सांस्कृतिक तसेच शैक्षणिक उपक्रमांचे भव्य प्रमाणावर आयोजन समाधी स्थानी असलेल्या श्री संत गजानन महाराज पट्टेकर सभागृहात करण्यांत आले आहे.
या पुण्यतिथी उत्सवाची सांगता सोमवार दि. १५ सप्टेंबर रोजी होणार असून या दिवशी पहाटे सव्वा पाच वाजता श्रीं चा प्रयाणकाळ उत्सव होणार असून तदनंतर काल्याचे कीर्तन झाल्यावर सर्वांना महाप्रसाद देण्यात येईल. सायंकाळी सव्वापाच वाजता महाराजांची पालखीतून भव्य मिरवणूक काढण्यात येईल.
श्री संत राममारुती महाराज समाधी मंदिर हे कल्याण (प.) येथील जूना दूध नाक्याजवळ असून कल्याण स्टेशनवरून रिक्षा अथवा टांग्याने लालचौकी येथे उतरून समाधी स्थानी जाता येते. समाधिस्थान अतिशय जागृत असून हजारो भाविकांना यांची नित्य प्रचिती येत असते. अश्या या जागृतस्थानीं श्रींचे पुण्यतिथी उत्सवाचे निमित्ताने येवून दर्शन-आशीर्वादाचा लाभ घ्यावा व सक्रिय सहकार्य करावे असे आवाहन संस्थानचे वतीने श्री.शिरीषजी गडकरी यांनी केले आहे.
कृपया वरील मजकुरास प्रसिद्धी देण्यात यावी हि नम्र विनंती.
(श्री सुरेंद्र देशमुख, डोंबिवली यांजकडून – मो.नं. ९८२१८८५९०५)
कल्याणचे वैभव म्हणून प्रसिद्धी पावलेल्या संत राममारूती महाराज पुण्यतिथी उत्सवास शानदार प्रारंभ
