संगमेश्वर : तालुक्यातील निवे बद्रुक येथील सुखदा मंगेश यादव (वय २९) या विवाहितेचा कीटकनाशक प्राशन केल्याने कोल्हापूर येथील सी.पी.आर. रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना मंगळवार, ८ जुलै २०२५ रोजी सायंकाळी ७.१५ च्या सुमारास घडली होती.
मिळालेल्या माहितीनुसार, सुखदा यादव यांनी कीटकनाशक औषध प्राशन केले होते. त्यानंतर त्यांना तात्काळ उपचारासाठी रत्नागिरी येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारांसाठी त्यांना कोल्हापूर येथील सी.पी.आर. रुग्णालयात हलवण्यात आले.
गेले काही दिवस त्यांच्यावर कोल्हापूर येथे उपचार सुरू होते, मात्र उपचारादरम्यानच सोमवार, १४ जुलै रोजी रात्री १०.१५ वाजता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
या घटनेची नोंद देवरुख पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून करण्यात आली आहे.