रत्नागिरी : तालुक्यातील जयगड सडेवाडी येथे मटका जुगार चालवत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी कारवाई करत एकावर गुन्हा दाखल केला. ही कारवाई जयगड पोलिसांनी ४ ऑगस्ट रोजी केली.
शुभम प्रकाश चव्हाण (वय ३२, रा. जुनी तांबट आळी, रत्नागिरी) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयिताचे नाव आहे. त्याच्याकडून पोलिसांनी ३५० रुपयांचा जुगाराचा मुद्देमाल आणि साहित्य जप्त केले आहे.
या प्रकरणी महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम १२ (अ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास जयगड पोलिस करत आहेत.
जयगडमध्ये मटका जुगारप्रकरणी गुन्हा दाखल
