तुषार पाचलकर / राजापूर : गेल्या चार महिन्यांपासून सर्व काही सुरळीत सुरू असताना अचानक मनसेचे नेते शिरीष सावंत आणि नितीन सरदेसाई यांनी जिल्हाध्यक्ष, विधानसभा अध्यक्ष, तालुकाध्यक्ष, शहराध्यक्ष अशा अनेक पदांना स्थगिती दिली. या निर्णयामागील कारण विचारल्यावर “लवकरच थेट नियुक्त्या होतील” असे उत्तर मिळाले. मात्र, याबाबत स्पष्टता न मिळाल्याने पक्षात नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.
या संदर्भात बोलताना अविनाश सौंदळकर यांनी सांगितले की, “अनेकदा राजसाहेबांना भेटण्याचा प्रयत्न केला, परंतु भेट झाली नाही. साहेबांच्या पीएंकडे विचारणा केली असता ‘तुमच्या नेत्यांना भेटा’ असे उत्तर मिळाले. या सगळ्या प्रक्रियेत नेमका निर्णय होत नाही, हीच मोठी खंत आहे.”
त्यांनी पुढे कार्यकर्त्यांची व्यथा मांडताना स्पष्ट केले की, “पक्षासाठी आम्ही काय नाही केले? दोन वेळा निवडणुका लढलो, कोट्यवधी रुपये खर्च केले, जिल्ह्यातील प्रत्येक कार्यक्रमाला पैसा दिला. कार्यकर्ते सक्षम असूनही त्यांचा सन्मान होत नाही. राजसाहेबांच्या अवतीभोवती असणाऱ्या नेत्यांची वागणूक कार्यकर्त्यांना सहन होत नाही.”
सौंदळकर म्हणाले, “आज सकाळपासून माझ्या कार्यकर्त्यांचे सतत कॉल येत आहेत. ते माझ्या सोबत आहेत. त्यामुळे मला याबाबत काहीही टेन्शन नाही. मात्र निष्ठावंत कार्यकर्त्यांवर जर अशा गोष्टी होत असतील, तर पक्षातील प्रत्येक कार्यकर्त्याने विचार करावा.”
पदावरून हटवल्यानंतर मनसेचे अविनाश सौंदळकर यांची पहिली प्रतिक्रिया म्हणाले,…
