GRAMIN SEARCH BANNER

खेडमध्ये रेल्वेत चढताना महिलेच्या पर्समधील मंगळसूत्र लांबवले

Gramin Search
8 Views

खेड : येथील रेल्वे स्टेशन प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वरून ट्रेनमध्ये चढत असताना समृद्धी संदेश साळुंखे ( 26) यांच्या पर्समधून 1,30,000 रुपये किमतीचे सोन्याचे तीनपदरी मंगळसूत्र अज्ञात चोरट्याने लंपास केले. ही घटना 22 जून रोजी दुपारी 4.30 वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी 26 जून रोजी सायंकाळी 4.52 वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी समृद्धी साळुंखे (रा. मूळ गाव तळे मांडवे, ता. खेड, जि. रत्नागिरी, सध्या रा. नायगाव, जुचंद्र, पोस्ट चंद्रपाडा, ता. पालघर, जि. वसई) यांनी तक्रार दिली. त्यांची पर्समधील मंगळसूत्राची चेन उघडून अज्ञात चोरट्याने चोरी केली. चोरीला गेलेल्या मंगळसूत्राचे वजन 45 ग्रॅम 140 मिली असल्याचे नमूद करण्यात आले आहे. याप्रकरणी अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Total Visitor Counter

2651278
Share This Article