रत्नागिरी: गेल्या शनिवारी झालेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत मंडणगड तालुक्यात शिंदे शिवसेनेला निर्विवाद, तर संगमेश्वर तालुक्यात संमिश्र, तर रत्नागिरीत महायुतीला निर्विवाद यश मिळाले.
मंडणगड तालुक्यात जिल्हा परिषदेचे २ गट, पंचायत समितीचे ४ गण आहेत. त्या सर्व ठिकाणी शिंदे शिवसेनेचे उमेदवार विजयी झाले.
संगमेश्वर तालुक्यात जिल्हा परिषदेचे ७ गट आहेत. तेथे शिवसेनेला २, भाजपला १, उबाठाला ३. तर राष्ट्रवादी काँग्रेसला १ जागा मिळाली. संगमेश्वर पंचायत समितीतील १४ गणांमध्ये राष्ट्रवादी ४, शिवसेना शिंदे गट ४, शिवसेना ठाकरे गट ४ आणि भाजपला २ जागा मिळाल्या.
रत्नागिरी तालुक्यात जिल्हा परिषदेचे १० गट, तर पंचायत समितीचे २० गण आहेत. त्या सर्व ठिकाणी महायुतीचे सर्व उमेदवार विजयी झाले. त्यामध्ये भाजपला मिळालेला एक गट आणि २ गणांचा समावेश आहे.






