GRAMIN SEARCH BANNER

रत्नागिरी जिल्ह्यातील 6 खत विक्रेत्यांचे परवाने निलंबित

Gramin Varta
284 Views

पॉस मशीनचा वापर न केल्याने जिल्हा अधिक्षक कृषी अधिकाऱ्यांची कारवाई

रत्नागिरी:-  रासायनिक खतांची विक्री पॉइंट ऑफ सेल (पॉस) मशीनद्वारे न करणे तसेच खत नियंत्रण आदेश १९८५ मधील तरतुदींचे उल्लंघन केल्याप्रकरणी जिल्ह्यातील 6 खत विक्रेत्यांचे विक्री परवाने तात्काळ प्रभावाने निलंबित करण्यात आले. तर 5 विक्रेत्यांना भविष्यात नियमांचे काटेकोर पालन करण्याबाबत सक्त ताकीद देण्यात आली आहे. ही कारवाई परवाना अधिकारी तथा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, शिवकुमार सदाफुले यांनी केली आहे.

खत विक्रेत्यांना रासायनिक खतांची विक्री ही पॉस मशीनद्वारे करणे बंधनकारक आहे. असे असतानाही, तपासणीमध्ये काही विक्रेते या नियमांचे पालन करत नसल्याचे आढळून आले. खत नियंत्रण आदेशाचे हे स्पष्ट उल्लंघन असल्याने कृषी विभागाने ही कारवाई केली आहे. जिल्ह्यातील इतर सर्व खत विक्रेत्यांनी नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, अन्यथा त्यांच्यावरही अशाच प्रकारची कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा श्री. सदाफुले यांनी दिला आहे.

Total Visitor Counter

3369675
Share This Article