GRAMIN SEARCH BANNER

मिरकवाडा बंदरात आढळला कोकणनगर येथील तरुणाचा मृतदेह

Gramin Varta
373 Views

रत्नागिरी : शहरातील मिरकवाडा बंदर परिसरातील जेटी क्रमांक २ येथे शुक्रवारी सकाळी अकराच्या सुमारास एका पुरुषाचा मृतदेह पाण्यात तरंगताना आढळून आला. मृत व्यक्तीची ओळख मिलिंद अनंत खेडेकर (वय ४६, रा. म्हाडा कॉलनी, कोकणनगर, रत्नागिरी) अशी झाली आहे.

घटनेची माहिती मिळताच रत्नागिरी शहर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी भेट देत पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह पुढील वैद्यकीय तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला असून या प्रकरणाचा पुढील तपास शहर पोलिसांकडून सुरू आहे.

Total Visitor Counter

3369673
Share This Article