GRAMIN SEARCH BANNER

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-मडगांव दरम्यान धावणार विशेष गाड्या

Gramin Varta
115 Views

मुंबई: छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-मडगांव दरम्यान विशेष गाड्यासह एकुण ८ अतिरिक्त विशेष गाड्या धावणार आहेत. मध्य रेल्वेकडून उन्हाळ्याच्या हंगामात प्रवाशांच्या सोयीसाठी या विशेष गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे.

या विशेष गाडयांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस -मडगांव ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस विशेष (४ फेऱ्या) ट्रेन क्रमांक 01129 ही विशेष गाडी दिनांक ०३.०४.२०२६ ते ०५.०४.२०२६ रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून ००.२० वाजता निघेल आणि मडगांव येथे त्याच दिवशी १५.१५ वाजता पोहोचेल. (०२ फेऱ्या) ट्रेन क्रमांक 01130 ही विशेष गाडी दिनांक ०३.०४.२०२६ आणि ०५.०४.२०२६ रोजी मडगांव येथून १६.०० वाजता निघेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे दुसऱ्या दिवशी ०३.४५ वाजता पोहोचेल. (०२ फेऱ्या) या गाडीला दादर, ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगांव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिविम आणि करमाळी हे थांबे देण्यात आले आहेत.

लोकमान्य टिळक टर्मिनस नागपूर लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष (२ फेऱ्या) ट्रेन क्रमांक 01021 ही विशेष गाडी दिनांक ०३.०४.२०२६ (शुक्रवार) रोजी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून ००.५५ वाजता निघेल आणि नागपूर येथे त्याच दिवशी १५.४५ वाजता पोहोचेल. (०१ फेरी), ट्रेन क्रमांक 01022 ही विशेष गाडी दिनांक ०३.०४.२०२६ (शुक्रवार) रोजी नागपूर येथून २०.०० वाजता निघेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथे दुसऱ्या दिवशी ११.४५ वाजता पोहोचेल. (०१ फेरी) या गाडीला ठाणे, कल्याण, इगतपुरी (ट्रेन क्रमांक 01022 साठी), नाशिक रोड, मनमाड, जळगांव, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, मूर्तिजापूर, बडनेरा, धामणगाव आणि वर्धा हे थांबे देण्यात आले आहेत.

Total Visitor Counter

3200367
Share This Article