रत्नागिरी : महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था, संचालित बाया कर्वे व्होकेशनल ट्रेनिंग इंस्टिट्यूट, (BKVTI), रत्नागिरी तर्फे ‘सारी ड्रेपिंग कार्यशाळेचे’ आयोजन सोमवार दिनांक 25 ऑगस्ट 2025 रोजी BKVTI मारुती मंदिर रत्नागिरी येथे करण्यात आले होते.साडी नेसण्याच्या विविध प्रकारच्या पद्धती याचे प्रशिक्षण देण्यात आले.
सारी ड्रेपिंग कार्यशाळेमध्ये लागणाऱ्या मॉडेल्स ब्युटी अँड वेलनेस डिपार्टमेंटच्या विद्यार्थिनींनी सुद्धा सहभाग घेतला होता. यामध्ये सहावारी साडी, ब्राह्मणी साडी, नऊवारी साडी, सहावारीपासून नऊवारी साडी, साडीचा वापर करून घागरा कशाप्रकारे नेसायचा, गुजराती पॅटर्न साडी कशाप्रकारे नेसायचे याचे प्रशिक्षण घेण्यात आले. ही कार्यशाळा सौ. सिद्धी सावंत यांच्या हस्ते पार पाडण्यात आली. अतिशय उत्साही आणि आनंदी वातावरणामध्ये ही कार्यशाळा संपन्न झाली.
BKVTI, रत्नागिरी तर्फे महिलांसाठी सारी ड्रेपिंग कार्यशाळा संपन्न
