GRAMIN SEARCH BANNER

गुणवत्ताधारक कु.अन्वेद देसाई याचा जाकादेवी विद्यालयातर्फे गौरव

जाकादेवी/ वार्ताहर:- रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड एज्युकेशन सोसायटीच्या जाकादेवी येथील तात्यासाहेब मुळ्ये माध्यमिक विद्यालयातील इ.५ वी शिष्यवृत्ती परीक्षेत कु.अन्वेद सचिन देसाई याने  जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर जिल्हा गुणवत्ता यादीत १७ वा तर तालुका गुणवत्ता यादीत ३ रा क्रमांक पटकावल्यानेज् विद्यालयातर्फे सत्कार करण्यात आला.

गुणवंत विद्यार्थी कु.अन्वेद देसाई  याला शिष्यवृत्ती परीक्षा विभागाचे ज्येष्ठ शिक्षक केशव राठोड, वर्गशिक्षिका सौ. प्राची पवार,सौ.सायली राजवाडकर , हेमराज बहिरम  तसेच अन्वेदची  आई सौ. समृद्धी सचिन देसाई यांचे  बहुमोल मार्गदर्शन लाभले. कु. अन्वेद देसाई याचे मालगुंड शिक्षण संस्थेचे चेअरमन सुनिल उर्फ बंधू मयेकर ,मुख्याध्यापक नितीन मोरे, पर्यवेक्षक शाम महाकाळ तसेच संस्थेचे पदाधिकारी, सर्व संचालक यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Total Visitor Counter

2455556
Share This Article