GRAMIN SEARCH BANNER

गुहागर : सापडलेले पैशाचे पाकीट रिक्षा चालकाने मूळ मालकाला केले परत

गुहागर /प्रतिनिधी:पैसा म्हटलं की कोणाचं मोह आवरत नाही, कोण धमकावून तर कोणी फसवून पैसा कमाईच्या मागे लागलेला असतो मात्र सापडलेले पैशाचे पाकीट मूळ मालकाचा शोध घेऊन त्याला परत करण्याचा प्रामाणिकपणा गुहागर शहरातील रिक्षाचालक पराग कमलाकर भोसले यांनी दाखवला असून त्यांचा हा प्रामाणिकपणा सर्वांसाठी आदर्शवत ठरला आहे.

गुहागर एसटी डेपो समोरील रिक्षा स्टॅन्ड जवळ शनिवार  21 जून 2025 रोजी एक 8500/-रु.असलेलं पैशाचे पाकिट रिक्षा चालक पराग कमळाकर भोसले यांना सापडले होते. हे पाकीट गुहागर शहरातीलच महिला नागरी पतसंस्थेची पिग्मी एजंट सलोनी शेखर विखारे हीचे असल्याचे पुराव्या सह समजल्यावर पराग भोसलेंनी ते परत दिले. त्यांच्या या प्रामाणिकपणाबद्दल शहरात त्यांचे कौतुक होत आहे.

Total Visitor Counter

2475145
Share This Article