खेड : मुंबई-गोवा महामार्गावर कळंबणी वाळंजवाडी बस स्टॉपसमोर एक भीषण मोटार अपघात झाला. या अपघातात एका पादचारी महिलेला गंभीर दुखापत झाली आहे. रुपाली राजेंद्र कदम (वय ३४, रा. कळंबणी पिंपळवाडी, ता. खेड), असे जखमी झालेल्या महिलेचे नाव आहे. ही घटना १९ जुलै २०२५ रोजी सकाळी ९.३० वाजता
प्राथमिक माहितीनुसार, रुपाली राजेंद्र कदम या त्यांच्या ॲक्टिव्हा गाडीने चंदी हवेली हॉटेल येथील पान स्टॉलकडे जात असताना हा अपघात घडला. आरोपी स्वरूप नरेंद्र शिरगावकर (रा. बुरोंडी, ता. दापोली) हा त्याच्या ताब्यातील स्प्लेंडर गाडी (क्र. MH ०८ BH ४७६५) भरधाव वेगाने आणि निष्काळजीपणे चालवत होता. रस्त्याच्या विशिष्ट परिस्थितीकडे दुर्लक्ष करून, त्याने रस्ता ओलांडणाऱ्या मंजुळा रघुनाथ शिंदे (वय ५५, रा. कळंबणी पिंपळवाडी, ता. खेड) या पादचारी महिलेला जोरदार धडक दिली.
या धडकेत मंजुळा रघुनाथ शिंदे यांना लहान-मोठ्या दुखापती झाल्या असून, त्यांना तात्काळ उपचारासाठी दाखल करण्यात आले. हा गुन्हा भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ च्या कलम २८१, १२५ (अ), १२५ (ब) आणि मोटार वाहन कायदा कलम १८४ अंतर्गत दाखल करण्यात आला आहे.
मुंबई-गोवा महामार्गावर खेड येथे भीषण अपघातात महिला जखमी
