GRAMIN SEARCH BANNER

भाजप ओबीसी शहराध्यक्षपदी अमित विलणकर यांची नियुक्ती

Gramin Varta
60 Views

रत्नागिरी (प्रतिनिधी): भारतीय जनता पार्टीच्या ओबीसी शहराध्यक्षपदी श्री. अमित विलणकर यांची निवड करण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली ही नियुक्ती करण्यात आली असून, पक्षाने त्यांच्यावर विश्वास दाखवला आहे.

विलणकर यांच्या नियुक्तीचा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी जिल्हाध्यक्ष श्री. राजेश सावंत यांच्या हस्ते अमित विलणकर यांना अधिकृत नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.

या प्रसंगी जिल्हाध्यक्ष राजेश सावंत, शहराध्यक्ष दादा ढेकणे, युवा जिल्हाध्यक्ष मंदार खंडकर यांच्यासह पदाधिकारी मनोज पाटणकर, राजू भाटलेकर, निलेश आखाडे, संदीप सुर्वे, शैलेश बेर्डे, समीर वस्ता, नितीन जाधव आदी भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नियुक्तीनंतर श्री. अमित विलणकर यांनी पक्षाने दाखवलेल्या विश्वासाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. तसेच, ओबीसी शहराध्यक्ष पदाची जबाबदारी पूर्ण प्रामाणिकपणे पार पाडण्याचा आणि संघटना बळकट करण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करून भावी कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

या नवीन नियुक्तीमुळे भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये नवीन उत्साहाचे आणि ऊर्जेचे वातावरण निर्माण झाले असून, पक्ष संघटनेला बळकटी मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

Total Visitor Counter

2646941
Share This Article