▪️स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजित उपक्रमाना विद्यार्थी, पालकांची साथ
▪️ग्रामपंचायत, माजी विद्यार्थी, ग्रामस्थ, शिक्षणप्रेमी यांचाही उदंड प्रतिसाद
रत्नागिरी ( प्रतिनिधी )
शासन निर्देशानुसार स्वातंत्र्यदिनानिमित्त हर घर तिरंगा अंतर्गत विविध कार्यक्रम शाळाशाळांत राबविले जात आहेत. त्यास अनुसरून तालुक्यातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श शाळा नाखरे नं. १ मध्ये गाथा राष्ट्रभक्तीची हा उपक्रम मोठया उत्साहात संपन्न झाला. २ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट अखेर राबविलेल्या या उपक्रमात इयत्ता सहावीच्या १४ विदयार्थ्यांनी पुढाकार घेतला. सावित्रीबाई फुले, राजमाता जिजाऊ, रमाई आंबेडकर, झाशीची राणी,अहिल्याबाई होळकर,मी भारतमाता बोलतेय, क्रांतिकारक उमाजी नाईक,लहुजी वस्ताद,भगतसिंग, लोकमान्य टिळक, राजर्षी शाहू महाराज, छत्रपती शिवाजी महाराज यांचे कार्य आणि विचार त्यांनी प्रभावीपणे कथन केले.
विद्यार्थात राष्ट्रप्रेम वाढीस लागावे, मायभूमीविषयी आदर वृद्धिंगत व्हावा तसेच प्रभावी कथन कौशल्य विकसन आणि आत्मविश्वास वाढावा या हेतूने पदवीधर शिक्षक सुहास वाडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सदर उपक्रम आयोजित केल्याची प्रतिक्रिया मुख्याध्यापक राजेंद्र भिंगार्डे यांनी दिली.
दरम्यान स्वातंत्र्यदिनानिमित्त प्रशालेमार्फत घेण्यात आलेल्या विविध स्पर्धाचा निकाल जाहीर करण्यात आला.त्यातील प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक पुढीलप्रमाणे : *चित्रकला* ( मोठा गट ) सार्थक वैभव गुरव, सिया सचिन वाळिंबे, तीर्था धर्मेंद्र कुळये ( लहान गट ) सिहान विशाल जाधव, ईशा नितेश शिर्के, कुणाल गणेश शिंदे,
वक्तृत्व स्पर्धा : सिया सचिन वाळिंबे, दुर्वा सुधीर धुळप, आरुष तुळशी दास गावडे, *निबंध स्पर्धा*: अस्मि सुहास धुळप, स्वरा स्वप्निल गमरे, तीर्था धर्मेंद्र कुळये
तिरंगा राखी निर्मिती कार्यशाळा : संस्कृती प्रसाद पावसकर, हर्ष रामदास लांजेकर, ओवी दीपक शिंदे
वेशभूषा : श्रावणी पर्शुराम मेस्त्री, आरुष गिरीष शिंदे, दुर्वेश नंदकुमार जाधव
*सजावट*: अर्णव स्वप्निल गमरे, यश परेश लिंगायत, शर्वरी संतोष साळवी
*स्वच्छतादूत*: साहिल राकेश पाष्टे, सर्वेश राकेश गुरुव, ओम संतोष गुरव *हस्तकला*: हर्षद रामदास लांजेकर, स्वरूप उदय मेस्त्री, निहार मोहन घवाळी
घोषवाक्य : मानस सूर्यकांत मुंगणेकर, अभिज्ञ दिलीप जाधव,उन्नती विकास जाधव
रांगोळी : योगिनी सुबोध शिंदे, स्वरा स्वप्निल गमरे, क्षितिजा संतोष सोमेस्कर, आरोही अनिकेत घवाळी *ध्वजारोहण संचालन :* तनिष परेश लिंगायत, प्रज्वल साळवी, विघ्नेश विजय साळवी, संस्कार धर्मेंद्र कुळये. यशस्वी विदयार्थी, मार्गदर्शक शिक्षक यासह संगीत कवायत, गीतगायन आदि विविध उपक्रमांचे तसेच प्रशालेच्या माजी विद्यार्थी भरीव सहकार्याचे शा. व्य. स. अध्यक्ष रामदास लांजेकर आणि सदस्य, उपसरपंच विजय चव्हाण, सरपंच विद्या जाधव, केंद्रप्रमुख रिहाना म्हसकर, विस्तार अधिकारी भाग्यश्री हिरवे, गटशिक्षणाधिकारी डी. बी. सोपनूर यांनी विशेष अभिनंदन केले. यशस्वीतेसाठी शिक्षिका श्रावणी केळकर, अंगणवाडी सेविका मंगला चव्हाण, मदतनीस योगिता शिंदे, स्वयंपाकी पूजा धुळप, मनिषा धुळप, अपेक्षा नार्वेकर, मीना राजू मंच यांचे विशेष सहकार्य लाभले.