GRAMIN SEARCH BANNER

गुहागरमध्ये मटका जुगार खेळणाऱ्यावर गुन्हा दाखल

गुहागर: गुहागर तालुक्यातील शृंगारतळी बाजारपेठेतील कोंबडी गल्ली येथे बेकायदेशीरपणे कल्याणी मटका जुगार खेळणाऱ्या एका व्यक्तीला गुहागर पोलिसांनी गुन्हा दाखल आहे. ही कारवाई काल, २० जून २०२५ रोजी सायंकाळी ६.४५ वाजता करण्यात आली.

मिळालेल्या माहितीनुसार, गुहागर पोलीस ठाण्याचे पोलीस शिपाई प्रितेश परशुराम रहाटे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, सदाशिव मय्यप्पा होणमराठे (वय ४८, रा. जानवळे, ता. गुहागर) हा शृंगारतळी बाजारपेठेतील कोंबडी गल्ली येथील पायवाटेच्या कडेला कल्याण मुंबई/मटका जुगाराचे आकडे घेऊन खेळ खेळत असताना रंगेहाथ पकडला गेला. त्याच्याकडे जुगारासाठी लागणारे साहित्य आणि रक्कमही आढळून आली.

गुहागर पोलिसांनी आरोपी सदाशिव होणमराठे याच्याविरुद्ध महाराष्ट्र जमीन कायदा पेनल्टी १२(अ) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास गुहागर पोलीस करत आहेत. ही कारवाई २० जून २०२५ रोजी रात्री १०.५८ वाजता दाखल करण्यात आली.

Total Visitor Counter

2475126
Share This Article