GRAMIN SEARCH BANNER

रायगडच्या शिलेदारांनी नवी मुंबईमध्ये वाचविले महिलेचे प्राण

रायगड: नवी मुंबई बेलापूर येथील ध्रुवतारा जेट्टी येथे एक अपघात घडला.सदर अपघात इतका भीषण होता की एक महिला रस्ता चुकल्याने ती महिला स्वतः चालवत असलेल्या कार सहित बेलापूर खाडी मध्ये कोसळली.

त्याच वेळी सदर ठिकाणी MTHL (अटल सेतु) येथे अपघात घडल्यास बचाव कार्य करण्यास आर्यन पंप्स अँड इन्व्हायरो सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड मार्फत उपस्थित असणारे इंडियन रेस्क्यु अकॅडमीच्या बचाव पथकातील जवानांनी पोहत जाऊन शर्थीचे प्रयत्न करून त्या महिलेस वाचवून जीवनदान दिले होते.

सदर बचाव पथकातील इन्चार्ज सम्राट नरेंद्र लाड राहणार (रोहा), अमित संजय खैरे(आपदा मित्र – महाड), संस्कार तुळशीराम नाकती(तळा), शुभम सुरेश पाटिल(नागोठणे), प्रज्योत सुरेश सानप (रोहा), सुरज संदेश चव्हाण(तळा) हे सर्व जवान आपल्या रायगड जिल्ह्यातील रहिवासी असून आपल्या रायगड जिल्ह्यास अभिमानास्पद अशी हि कामगिरी सदर बचाव पथकाने केली आहे.

या कामगिरी बद्दल नवी मुंबई पोलिस आयुक्त मा. मिलिंद भारंबे यांच्या तर्फे सदर बचाव पथकातील जवानांस प्रशंसापत्र देऊन गौरविण्यात आले.

तरी रायगड जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांनी सर्वांना अशी कामगिरी करण्यास प्रेरणा मिळावी या साठी सदर बचाव पथकातील या सर्व जवानांचा यथोचित सन्मान करावा अशी मागणी या लेखाद्वारे जिल्हाधिकारी रायगड यांच्या कडे करण्यात येत आहे.

Total Visitor Counter

2455917
Share This Article